रांजणगाव एमआयडीसी परिसरातील बंद पडलेल्या कंपनीत चोरी करण्याच्या उद्देशाने घुसलेल्या गुजरातमधील सहा जणांना रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून चोरीसाठी लागणारे साहित्य, हत्यारे तसेच गुजरात पासिंग असलेली कार असा एकूण 3 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.