शेवगाव: शेवगांव जळीत प्रकरण उघडकीस.. दोन आरोपीना स्थानिक गुन्हे शाखेने केलं जेरबंद...
शेवगाव तालुक्यातील आव्हाने येथील साई गणेश किराणा दुकानाच्या जळीत प्रकरणातील दोन आरोपी अहिल्या नगर स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहेत. काही दिवसांपूर्वी तीन अज्ञात इसमांनी दुकानाच्या शटर वर पेट्रोल टाकून दुकान पेटून देऊन मोठं नुकसान केलं होतं. याबाबत राहुल कोळगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शेवगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्हयातील आरोपींची नाते निलेश नेहूल व गौरव उजागरे अशी असून त्यांना तपोवन रोड येथून अटक करण्यात आली आहे.