घनसावंगी: मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आरक्षण मिळावे या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथून आरक्षण वारीचे मुंबईकडे प्रस्थान
मराठा समाजाला सरसकट ओबीसी प्रवर्गातून कुणबी म्हणून आरक्षण मिळावे,या मागणीसाठी आज सकाळी आंतरवाली सराटी येथून आरक्षण वारीचे मुंबईकडे प्रस्थान झाले. गावातील महिला भगिनींनी मनोज जरांगे यांचे पंचारतीने औक्षण केले.गेल्या दोन दिवसांपासून लाखोंच्या संख्येने जमलेल्या समाजबांधवांना सोबत घेऊन जरांगे पाटील यांनी आंतरवाली गाव सोडले.त्यांच्यासोबत शेकडो वाहनांसह लाखोंच्या संख्येत समाजबधवांचा सहभाग होता.