जालना शहरातील अंबड रोडवरील इंदेवाडी पाण्याच्या टाकीजवळ एसएसटी पथकाने वाहन तपासणीदरम्यान 15 लाख 27 हजार 940 रुपयांची रोकड जप्त केली आहे. ही कारवाई बुधवार दि. 7 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी सुमारे 6.30 वाजता करण्यात आली. जप्त करण्यात आलेली रोकड तालुका जालना पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली असून, रात्री 12 वाजेपर्यंत नोंद घेण्याची प्रक्रिया सुरू होती. जालना शहर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रमुख रस्ते व महामार्गांवर एसएसटी पथके तैनात करण्यात आली आहेत.