लातूर: बाबव...! मनपाने केले एकाच दिवसात 4 कोटींचे विक्रमी कर संकलन!आयुक्त मानसी आणि उपायुक्त डॉ. खानसोळे यांची कार्यकुशलता
Latur, Latur | Nov 30, 2025 लातूर :-बाबव...! एकाच दिवसात महापालिकेने केली चार कोटीची विक्रमी कर वसुली असं म्हणायला आज महापालिकेच्या बाबतीत काही हरकत नाही.लातूर शहर महानगरपालिकेच्या आयुक्त मानसी व उपायुक्त डॉ. पंजाबराव खानसोळे यांनी पदभार घेतल्यापासून प्रशासनात सुरू केलेल्या पारदर्शक व कार्यक्षम कामकाजामुळे लातूरकरांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मनपामार्फत आयोजित ‘सेल्फी विथ रिसीप्ट’ विशेष कर वसुली मोहिमेला नागरिकांनी अतिशय मोठ्या प्रमाणात साथ देत विक्रमी करभरणा केला.