उमरेड: शिवापूर येथे जुगार खेळणाऱ्या आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल, 79,330 रुपयांचा मुद्देमाल जप्त
Umred, Nagpur | Sep 25, 2025 24 सप्टेंबरला उमरेड पोलीस रात्रगस्त करीत असताना त्यांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे शिवापूर येथे समाज मंदिराच्या मागे सुरू असलेल्या जुगारावर छापा मार कार्यवाही केली. याप्रकरणी अनिल गुडघे, रोशन गणवीर, कुणाल गणवीर, राजू लोखंडे, अनिल हांडे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून रोख रक्कम आणि दोन दुचाकी असा एकूण 79 हजार 330 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस क