चंद्रपूर: अवैधरिता गोवंशयाची तस्करी करणाऱ्या चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल, 17 जनावरांची सुटका, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
पो.स्टे.मुल अंतर्गत मौजा बेबाळ येथुन पिक अप मध्ये गोवंश तस्करी करुन तेलगांना येथे कत्तलीसाठी नेणार आहेत यावरुन स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर चे पथकाने मौजा बेबाळ येथे जावुन माहितीची खात्री केली असता सदर ठिकाणी गोवंश जनावराने भरलेली चारचाकी पिकअप वाहन दिसुन आल्याने वाहनाची पाहणी केली असता त्यात ५ नग गोवंश जनावरे दाटीने, कुरपणे व निर्दयतेने भरुन मिळुन आले व वाहनाखाली १२ नग जनावरे मिळुन आल्याने आरोपी क्र. १ समर्थ नागेश पुप्पलवार वय २१ वर्ष रा. बेबाळ यास ताब्यात घेवुन विचारपुस केली.