मानवत: बस प्रवासात अज्ञात चोरट्याने पँटच्या खिशातील 70 हजार केले लंपास अज्ञात चोरट्याविरोधात मानवत पोलीसात गुन्हा दाखल
फिर्यादी श्रीरंग मारोतराव कदम वय 76 वर्ष हे पाथरी येथील खत बियाणे खरेदीचे पैसे देण्यासाठी मानवत बस स्थानक येथे एसटी बसने पाथरीकडे जात असताना बस मध्ये चढताना किंवा रत्नापुर टोल नाक्यापर्यंत बस प्रवासा दरम्यान अज्ञात चोरट्याने फिर्यादी यांच्या पँटच्या खिशातील 70 हजार रोख रक्कम लंपास केल्याची घटना 11 डिसेंबर रोजी दुपारी 1 30 ते 1 40 वाजता घडली.