शिरपूर: शिरपूर शहराला अवैध सावकारीचा विळखा,वरवाडेसह पुन्हा शहरात 3 ठिकाणी सहकार व पोलीस पथकाचा छापा
Shirpur, Dhule | Oct 14, 2025 शहरात अवैध सावकारी करणाऱ्या शिरपूर शहरातील 3 संशयीतांच्या घरी एकाच वेळी 14 ऑक्टोबर रोजी शिरपूर शहर पोलिसांनी व सहकार विभागाने संयुक्त छापा टाकून कारवाई केली आहे.या छाप्यात शहरातील सुरेश रामचंद्र माळी,दिलीप बापू पाटील,नारायण जगनाथ मराठे यांच्या घरांवर छापा टाकून घरझडती घेण्यात आली.याप्रकरणी एका पीडिताने शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यावरून सहकार व पोलीस पथकाने तिन्ही संशयितांच्या घरावर छापा टाकण्यात आला.