धुळे शहरातील देवपूर साईबाबा नगर परिसरात नागरिकांच्या सतर्कतेमुळे दुचाकी चोरीचा डाव उधळून लावण्यात आला आहे. नकाणे रोडवरील साईबाबा नगर भागातून चोरीस गेलेल्या पल्सर व पॅशन प्रो दुचाकींसह दोन संशयितांना नागरिकांनी रंगेहाथ पकडत पश्चिम देवपूर पोलिसांच्या ताब्यात दिले. दोन्ही गाड्यांची किंमत सुमारे ९० हजार रुपये असून, पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.