महाड: लोणेरे येथे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची खासदार सुनील तटकरे यांनी घेतली भेट
Mahad, Raigad | Sep 22, 2025 आज सोमवार दिनांक २२ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी ४ च्या सुमारास रायगड जिल्ह्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे येथे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांनी सदिच्छा भेट घेतली. यावेळी शिक्षण, तंत्रज्ञान अशा विविध महत्त्वपूर्ण विषयांवर सकारात्मक चर्चा झाली.