मित्रासोबतचे संबंध सुधारण्याचे आमिष दाखवून एका तरुणीची तब्बल ४ लाख ३५ हजार २०० रुपयांनी फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार भंडारा येथे उघडकीस आला आहे. बासीम अली खान ऊर्फ 'बाबा' नाव सांगणाऱ्या एका भामट्याने दोन व्हॉट्सॲप क्रमांकांचा वापर करून फिर्यादी तरुणीशी संपर्क साधला. "तुमचे मित्रासोबतचे संबंध पुजा-पाठ आणि धार्मिक विधीद्वारे पूर्ववत करून देतो," असे खोटे आश्वासन देऊन या भामट्याने ५ ते ३० डिसेंबर २०२५ या कालावधीत तरुणीला टप्प्या-टप्प्याने पैसे भरण्यास प्रवृत्त केले...