शिरपूर: तालुक्यातील खर्दे बु.-उंटावद रस्तावर सेवा पंढरवाड्याअंतर्गत तहसीलदारां च्या हस्ते दुतर्फा वृक्षारोपण
Shirpur, Dhule | Sep 20, 2025 तालुक्यातील खर्दे बु.-उंटावद या रस्तावर छत्रपती शिवाजी महाराज अभियान अंतर्गत महसूल सेवा पंधरवाडा निमित्ताने 20 सप्टेंबर रोजी सकाळी साडे 11 वाजेच्या सुमारास तहसीलदार महेंद्र माळी यांच्या हस्ते दुतर्फा वृक्षारोपण करण्यात आले.राष्ट्रनेता पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांच्या वाढदिवस 17 सप्टेंबर ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती 2 ऑक्टोबर पर्यंत तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराज अभियान अंतर्गत महसूल सेवा पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले आहे.