वडवणी: डॉ.संपदा मुंडे आत्महत्या प्रकरण बीड कोर्टात चालवा; कवडगाव येथे बविमो अध्यक्ष बाबुराव पोटभरेंची मागणी
Wadwani, Beed | Oct 27, 2025 डॉ. संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणात, सर्व दोषींना सहआरोपी करावे तसेच हा खटला बीड न्यायालयात चालवावा, अशी मागणी बहुजन विकास मोर्चाचे अध्यक्ष बाबुराव पोटभरे यांनी केली आहे.वडवणी तालुक्यातील कवडगाव येथे, डॉ. संपदा मुंडे यांच्या कुटुंबाची भेट सोमवार दि 27 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6 वाजता घेतली. यावेळी बोलताना बाबुराव पोटभरे यांनी या प्रकरणातील सर्व संबंधितांवर कडक कारवाई करण्यात यावी आणि पीडितेला न्याय मिळावा, अशी मागणी केली.