चिखलदरा तालुक्यातील टेटू येथे घरगुती वादातून गंभीर मारहाणीची घटना घडली असून, जेवण न ठेवण्याचा जाब विचारल्याने संतप्त झालेल्या सुनेने लाकडी दांडक्याने डोक्यावर वार केल्याचा प्रकार दिनांक २५ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता उघडकीस आला आहे.फिर्यादी गन्नू तुमला चिमोटे (वय ६०,रा.टेटू, ता.चिखलदरा व आरोपी शांती राजेश चिमोटे हे नात्याने सासरे सून असून सासऱ्याने सुनेविरुद्ध चिखलदरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.