हिंगणघाट: शहरात रस्त्याच्या कडेला सिमेंट काँक्रीटवर गट्टु बसविण्याचा पर्यावरण संवर्धन संस्थेचा विरोध:न.प.कडून घेण्यात आली दखल
हिंगणघाट शहरात मोठ्या प्रमाणात रोड रस्त्यांचे कामे सुरू असून हे काम करीत असताना संबंधित नगरपरिषदेच्या वतीने रस्त्याच्या कडेला बसविण्यात येत आहे.गुट्ट हे सिमेंट काँक्रीटवर बसविण्यालाने याठिकाणी पाणी जिरणार नाही सोबतच झाडे सुध्दा लावता येणार नाही अशा प्रश्न पर्यावरण संवर्धन संस्थेचा वतीने उपस्थित करीत याचा विरोध करण्यात आला होता.याची दखल घेऊन नगरपरिषदेच्या वतीने काही प्रमाणात यात बदल केला आहे.यामुळे पर्यावरण संवर्धन संस्थेने आंदोलन मागे घेतल्याची माहिती अध्यक्ष आशिष भोयर यांनी दिली आहे.