शहादा: भमराटा नाका दरम्यान म्हसावद पोलिसांनी सापळा रचून 2 लाख 94 हजार 600 रुपये किंमतीच्या अवैध दारूसाठा जप्त
शहादा तालुक्यातील भमराटा नाका दरम्यान म्हसावद पोलिसांनी सापळा रचून 2 लाख 94 हजार 600 रुपये किमतीच्या अवैध मध्याचा साठा जप्त केल्याची कारवाई करण्यात आली होती. या प्रकरणी म्हसावद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस, अप्पर पोलीस अधीक्षक निलेश तांबे उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राजन मोरे, हेड कॉन्स्टेबल बहादुर भिलाला आदींच्या पथकाने ही कारवाई केली आहे.