दिग्रस: शहरातील एमबी कॉटेक्स जीनमध्ये कापूस उत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक लूट, कापसाचे वजन कमी दाखविल्याचा शेतकऱ्यांचा आरोप
दिग्रस शहरासह तालुक्यातील शेतकरी एमबी कॉटेक्स जीन येथे कापूस विक्रीला आणत आहे. एमबी कॉटेक्स जीन येथे शेतकऱ्याच्या कापसाचा वजन करून एकूण कापसात ५० किलो वजन जीन मार्फत कमी दाखविण्या येत आहे तसेच वजन कमी न केल्यास शेतकऱ्यांकडून पैशे घेत असल्याचा आरोप साखरा येथील शेतकरी अरविंद पवार यांनी आज दि. ५ डिसेंबर रोजी दुपारी २:३० वाजताच्या दरम्यान केला आहे. तशी तक्रार सुद्धा शेतकरी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.