बंडगार्डन रोडवरील एका ओयो हॉटेलमध्ये (हॉटेल ली रॉइस )पती-पत्नीच्या भांडणातून पतीने स्वतःला बाथरूम मध्ये फाशी घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे दोघेही पती-पत्नी मूळचे केरळचे रहिवासी आहेत पती हा कतार या देशात नोकरीसाठी असतो तर पत्नी ही पुण्यातील एका रुग्णालयात स्टाफ नर्सचे काम करते मात्र त्यांच्यामध्ये काही वादावादी नंतर पतीने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जाते