राहुरी: तांदुळवाडी-कोंढवड पूल पाण्याखाली,काहीकाळ वाहतुक ठप्प
अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरीमध्ये गेल्या तीन दिवसापासून सततच्या झालेल्या मुसळधार पावसाने मुळा धरणांमधून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे. काल सोमवारी रात्री मुळा धरणातून नदीपात्रात १२ हजार क्युसेक्स ने पाण्याचा विसर्ग केल्याने तसेच देव नदिच्या पाण्याचे तांदुळवाडी-कोंढवड पुल पाण्याखाली गेल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.