आषाढी एकादशीनिमित्त पिंप्राळा येथील पुरातन विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात वाणी समाज पंचमंडळाच्या वतीने पहाटेपासूनच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दरवर्षीप्रमाणे यंदाही रविवारी ६ जुलै रोजी सकाळी ५ वाजेपासून पूजेला सुरुवात झाली. यावर्षी पूजेचा मान ऋग्वेद जुनागडे आणि समृद्धी जुनागडे या वाणी दाम्पत्याला मिळाला.