बीड: नगरपरिषदेकडून शिवराज चौक परिसरात अतिक्रमणावर हातोडा, मोठ्या टपऱ्या जेसीबीच्या साह्याने केल्या उध्वस्त
बीड शहरातील शिवराज चौक परिसरात आज शनिवार, दिनांक 5 जुलै रोजी बीड नगर परिषदेच्या वतीने अतिक्रमणविरोधी मोहीम राबवण्यात आली. दुपारी बारा वाजता या कारवाईला सुरुवात झाली. यामध्ये मुख्यतः मोठ्या प्रमाणावर उभारण्यात आलेल्या टपऱ्या आणि दुकानांचे अतिक्रमण जेसीबीच्या साह्याने हटवण्यात आले. शिवराज चौक परिसरात अनेक दिवसांपासून अतिक्रमण झाल्याच्या तक्रारी प्राप्त होत होत्या. या ठिकाणी पादचाऱ्यांसह वाहनधारकांना देखील मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते.