दिग्रस तालुक्यातील चिरकूटा शेत शिवारात पिकाला पाणी देण्यासाठी कॅनॉलमध्ये बसविण्यात आलेली सुमारे १५ हजार रुपये किमतीची पाण्याची मोटार अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना दि. १५ डिसेंबर रोजी सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी शेतकरी देवराव फुलसिंग जाधव यांनी दि. १५ डिसेंबर रोजी रात्री १० वाजताच्या सुमारास दिग्रस पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून दिग्रस पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.