चंद्रपूर: वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबीयांची खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी घेतली सांत्वनपर भेट
मोहर्ली वनपरिक्षेत्रात झालेल्या दुर्दैवी वाघाच्या हल्ल्यात शेतकरी अमोल बबन नन्नावरे यांचा जागीच मृत्यू झाला. आज भामडेळी येथे नन्नावरे कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांच्या दुःखात सहभागी झाले. मानव वन्यजीव संघर्ष दिवसंदिवस अधिक वाढत असल्याने स्थानिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.