रामटेक: तहसील कार्यालय रामटेक येथे जिल्हाधिकारी श्री विपीन इटनकर यांनी साधला अधिकारी, कर्मचारी व तक्रारकर्त्यांशी संवाद
Ramtek, Nagpur | Jan 10, 2026 शनिवार दिनांक 10 जानेवारीला दुपारी साडेबारा ते दीड वाजता पर्यंत नागपूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटणकर यांनी तहसील कार्यालय रामटेक येथे उपस्थित राहून रामटेक तालुक्यातील समस्याग्रस्त नागरिकांच्या समस्या, तक्रारी ऐकून घेतल्या व त्यांचे निराकरण करण्याचे निर्देश उपस्थित संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. प्रलंबित समस्या सोडविण्यास काय अडचणी आहेत, याचीही विचारणा त्यांनी केली. यापूर्वी तालुक्यातील सर्व शासकीय विभागाच्या कामांचा त्यांनी आढावा घेतला.