पुसद: सार्वजनिक जागेवर धूम्रपान करणाऱ्या इसमांवर आरसीपी पथकाची कारवाई
Pusad, Yavatmal | Oct 16, 2025 कायदा व सुव्यवस्था बळकट करण्यासाठी तसेच जनतेच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पंधरा ऑक्टोबरला रात्रीच्या सुमारास आरसीपी पथकाने जास्त वरदळ नसलेल्या मोकळ्या जागेत धुम्रपान तसेच मद्यपन करणाऱ्या इसमावर कारवाई केली. आरसीपी पथक यांनी पुसद शहरातील मोकळ्या सामसूम असणाऱ्या सार्वजनिक जागेवर बसून धुम्रपान तसेच मद्यपान करून असत्य वर्तन करणाऱ्या व रात्रीच्या वेळी ट्रिपल सीट मोटरसायकल चालविणाऱ्या इसमावर मुंबई पोलीस अधिनियम तसेच मोटार व्हेईकल ॲक्ट नुसार 16 इसमावर कार्यवाही केली.