कुही: नवदुर्गा मंगल कार्यालय मांढळ येथे संत तुकाराम सहकारी पतसंस्थाच्या वार्षीक सर्वसाधारण सभेचे आयोजन
Kuhi, Nagpur | Sep 25, 2025 तालुक्यातील मध्यभागी असलेल्या नवदुर्गा मंगल कार्यालय मांढळ येथे 25 सप्टेंबर गुरुवारला दुपारी दोन वाजताच्या सुमारास संत तुकाराम सहकारी पतसंस्था च्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले .वार्षिक सर्वसाधारण सभेचे उद्घाटन उद्योजक रत्नाकर ठवकर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी माजी मंत्री सुनील केदार, माजी मंत्री राजेंद्र मुळक, खासदार श्यामकुमार बर्वे, आमदार संजय मेश्राम आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. याप्रसंगी गुणवंत विद्यार्थी यांचा सत्कार करण्यात आला.