जालना जिल्ह्यातील पिठोरी सिरसगावमध्ये बिबट्याची दहशत; शेळीची केली शिकार, परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण.. वनविभागाच्या वतीने गावकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन.. आज दिनांक 7 रविवार रोजी संध्याकाळी 6 वाजता मिळालेल्या माहितीनुसार अंबड तालुक्यातील पिठोरी सिरसगाव परिसरात पुन्हा एकदा बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. आज रविवारी पहाटेच्या सुमारास मेंढपाळ रामा पथाजी लघुटे यांच्या एका शेळीवर हल्ला करत बिबट्याने ती जागीच फस्त केली.