हिंगणघाट: कांढळी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र देण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव:कुणावार यांचे अधिकाऱ्यांना सूचना:कांनकाटी येथे डिस्पेन्स
हिंगणघाट विधानसभा श्रेत्रातील कित्येक दिवसापासून कांढळी येथे नविन प्राथमिक आरोग्य केंद्र देण्याबाबत आमदार कुणावार यांचे प्रयत्न सुरू होते.परंतु ते केंद्र कानकाटी येथे द्यावे अशा मागणीने आता केंद्र कांनकाटी की कांढळी याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. कांढळी गाव लोकसंख्येने मोठे असल्याने त्या ठिकाणी प्राथमिक केंद्र सुरू व्हावे अशी मागणी येथील ग्रामस्थांची होती तर कांनकाटी येथे जागा उपलब्ध आहे म्हणून तेथे देण्यात यावी अशी येथील नागरीकांची मागणी होत होती.शेवटी मार्ग निघाला आहे.