विक्रमगड: अवैधरित्या सुरू असलेल्या गावठी दारूच्या हातभट्टीवर पाणजू बेट परिसरात पोलिसांची कारवाई
अवैधरित्या गावठी दारूचे हातभट्टी पणजू बेट परिसरात सुरू असल्याची माहिती नायगाव पोलिसांना मिळाली मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सदर ठिकाणी छापा टाकला. या ठिकाणी पोलिसांना गावठी हातभट्टी व ते तयार करण्यासाठी असलेले साहित्य आढळून आले. पोलिसांनी कारवाई करत लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करत गावठी दारूचे नमुने संकुलित करून उर्वरित माल त्याठिकाणीच नष्ट करण्यात आला आहे. दोन आरोपींविरोधात नायगाव पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.