खुलताबाद: गदाना गावाच्या तीन लेकींची सरकारी सेवेत दमदार एंट्री, ग्रामपंचायतीत सन्मानाचा सोहळा
गदाना गावातील पूजा अधाने, कोमल ठेंगडे आणि रूपाली अधाने या तिन्ही कन्यांची ‘विद्युत सहाय्यक’ पदावर निवड होऊन गावाचे नाव उज्ज्वल झाले. त्यांच्या सत्कारासाठी ग्रुप ग्रामपंचायत कार्यालयात स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला. गावकऱ्यांनी पुष्पहार, शाल व श्रीफळ देऊन सन्मान केला. कार्यक्रमास उपसरपंच सविता चव्हाण, माजी सरपंच सविता पोपट चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य राजू चव्हाण यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. या उल्लेखनीय यशामुळे गावात अभिमानाचा माहोल निर्माण झाला आहे..