हिंगणा: रायपूर येथे कर्तव्यनिष्ठ शिक्षक व समाजसेवक स्व. संदीप विठ्ठलराव कोहाड यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन
Hingna, Nagpur | Oct 22, 2025 हिंगणा तालुक्यातील रायपूर ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच व प्रेरणादायी शिक्षक स्व. संदीप विठ्ठलराव कोहाड यांची आज जयंती साजरी करण्यात आली. शिक्षण, समाजसेवा आणि लोकहित या तिन्ही क्षेत्रांत त्यांनी उल्लेखनीय कार्य केले. उपसरपंच पदावर असताना नागरिकांच्या समस्यांवर तत्काळ तोडगा काढणे हे त्यांचे वैशिष्ट्य होते.शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि महिलांसाठी ते नेहमीच उपलब्ध असत होते