नागपूर शहर: गडकरींच्या दारी नाराजांचा मेळा ; बावनकुळे यांची मध्यस्ती... कार्यकर्त्यांनी थेट बावनकुळे यांच्याकडे केली तक्रार
नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी नामांकन अर्ज भरण्यास केवळ दोन दिवस शिल्लक असताना अजूनही कोणत्याही प्रमुख पक्षाने उमेदवारांची अंतिम यादी जाहीर केली नाही एकीकडे 151 जागांसाठी निवडणूक होणार असताना भारतीय जनता पक्षाकडे तब्बल चार हजाराहून अधिक इच्छुक उमेदवारांचे अर्ज आहे. उमेदवारी नाकारली जात असल्याने भाजपामधील अनेक जुने आणि निष्ठावंत कार्यकर्ते नाराज झाले आहेत या नाराजीचा उद्रेक आज पाहायला मिळाला