दिग्रस: दिग्रसच्या नागरिकांना विरोधकांकडून धमकावल्या जात आहे : खासदार संजय देशमुख
दिग्रस शहरातील राजकारणात दबावतंत्राचा वापर वाढत चालल्याचा आरोप खासदार संजय देशमुख यांनी केला आहे. नागरिकांना धमक्या देऊन राजकीय लाभ घेतल्याचे प्रकार समोर येत असून, अशा प्रयत्नांना न्यायव्यवस्थेने अलीकडेच दिलेल्या महत्वाच्या आदेशाने अटकाव केल्याचा त्यांनी उल्लेख केला. काही उमेदवारांनी वेगळ्या मार्गाने अविरोध निवडून येण्याचा प्रयत्न केला मात्र न्यायालयाने असा प्रकार रोखल्याचे खासदार संजय देशमुख यांनी आज दि. २४ नोव्हेंबर रोजी रात्री ९ वाजताच्या दरम्यान सांगितले.