धुळे: एकविरा मंदिरात लक्ष्मीपूजनाचा जागर; दीपोत्सव आणि विविध धार्मिक कार्यक्रमांना भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
Dhule, Dhule | Oct 21, 2025 धुळेतील खानदेश कुलस्वामिनी एकविरा देवी मंदिरात दिवाळीचा उत्साह ओसंडून वाहतो आहे. लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर भव्य दीपोत्सवात महाअभिषेक, महापूजा व महाआरतीसह विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. फुलांच्या आरासीत देवीचा गाभारा खुलून दिसला, तर हजारो दिव्यांच्या रोषणाईने मंदिर परिसर प्रकाशमय झाला. धनत्रयोदशीपासून सुरू झालेला हा सोहळा भाऊबीजेपर्यंत चालणार असून भाविकांची मोठी गर्दी उसळली आहे.