पैठण: पैठण बस स्थानक परिसरात सापडलेले 14000 रुपये विद्यार्थ्यांनी केले परत
शुक्रवार दिनांक 10 रोजी पैठण बस स्थानक परिसरात तीन विद्यार्थ्यांनी त्यांना सापडलेले 14 हजार रुपये रोख असलेले पाकीट मूळ प्रवाशाला परत करून उत्तम प्रामाणिकपणाचा आदर्श घालून दिला आहे दरम्यान पृथ्वी दत्तात्रय नलावडे राहणार दरेगाव पार्थराज सतीश लांडगे आणि श्रावण नितीन लांडगे राहणार आवडे उंचेगाव अशी बारावी शिक्षण घेणाऱ्या या तिघांची नावे आहेत बस स्थानक परिसरात पाकीट सापडल्यानंतर या तिघांनी त्वरीत वाहतूक नियंत्रक शरद देहाडे आणि आगार व्यवस्थापक गजानन मडके यांच्याकडे जमा केले