आरोग्य समिती सभा जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात संपन्न
9 views | Sindhudurg, Maharashtra | Nov 29, 2025 माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग श्री .रवींद्र खेबुडकर यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य समितीची सभा नुकतीच संपन्न झाली. या सभेमध्ये आरोग्य विभागाच्या विविध कार्यक्रमांचा आढावा मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी घेतला.यामध्ये आयुष्यमान कार्ड जास्तीत जास्त नागरिकांची काढून लोकांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले. त्याकरिता शासकीय कार्यालयात देखील ज्या अधिकारी,कर्मचाऱ्यांचे रेशनिंग कार्ड आधार सीडींग व आयुष्यमान कार्ड जनरेट करणे बाकी आहे त्याकरिता विशेष मोहीम घेऊन आयुष्यमान कार्ड तयार करण्याबाबत सूचना दिल्या.