तालुक्यातील परसोडी परिसरात आकाशातून अचानक दगडाचे दोन तुकडे पडल्याची थरारक घटना समोर आली असून, या प्रकारामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. सायंकाळच्या सुमारास घडलेल्या या घटनेने प्रत्यक्षदर्शींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले असून, हे तुकडे नेमके काय आहेत, याबाबत वैज्ञानिक कुतूहल जागे झाले आहे. सुगत बुद्ध विहाराजवळ राहणारे किशोर वाहने यांनी प्रसंगावधान राखत या घटनेची माहिती जवाहरनगर पोलीस ठाण्यात दिली आणि हे दोन्ही तुकडे पोलिसांच्या स्वाधीन केले.