धामणगाव रेल्वे: ढाकुलगाव शेतशिवार येथे बिबट्याने केली गायची शिकार ;शेतकरी, नागरिक, मेंढपाळात भीतीचे वातावरण ;जेरबंद करण्याची मागणी
ढाकुलगाव शेतशिवारात बिबट्याचा वावर वाढल्याने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बुधवारी बिबट्याने एका शेतकऱ्याच्या गाईवर हल्ला करून तिची शिकार केल्याची घटना घडली. या घटनेमुळे शेतकरी व मेंढपाळ वर्गात भीती पसरली असून नागरिकांनी सावधगिरी बाळगण्यास सुरुवात केली आहे.शेतशिवारालगत असलेल्या झुडपांच्या परिसरात बिबट्याचा मुक्त संचार दिसून येत आहे. जनावरे चरायला सोडणे किंवा शेतात जाणे धोकादायक ठरत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. काही दिवसांपासून बिबट्याचे पायांचे ठसेही आढळून आले होते.