समुद्रपूर: शहरातील १० वीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन संस्कार ज्ञानपीठच्या वतीने गुणगौरव
नुकताच माध्यमिक शालांत परीक्षेचा निकाल जाहीर झाला यावेळी समुद्रपूर येथील संस्कार ज्ञानपीठ येथील एकुण ८० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली त्यापैकी १८ विद्यार्थ्यांनी ९० टक्केच्या वर प्रावीण्य प्राप्त केले.अतिशय सामान्य परिस्थितीतून संघर्ष करत सर्वच शेतकरी कुटुंबातील प्रावीण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा व पालकांचा त्यांच्या गावात जाऊन,घरी जाऊन संस्कार ज्ञानपीठ चे मुख्याध्यापक राऊत उपमुख्यापक कृष्णा धुळे व शिक्षक यांनी पुष्गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या