समुद्रपूर: गव्हा कोल्ही पारधी बेड्यावर पोलिसांची अवैध गावठी मोहा दारू विरोधात वॉशआउट मोहिम:२ हजार २४० लिटर मोहा सडवा नष्ट
गव्हा कोल्ही पारधी बेड्यावर पोलिसांनी गावठी मोहा दारू गाळापाना विरोधात वॉशआउट मोहिम राबविण्यात या ठिकाणावरून २ लाख ४१ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल नष्ट केल्याची माहिती पोलिसांकडून प्राप्त झाली.प्राप्त माहितीनुसार गव्हा कोल्ही पारधी बेड्यावर मोठ्या प्रमाणात गावठी मोहा दारूचे गाळपान होत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळताच पोलीसांनी याठिकाणी जाऊन पाहणी केली असता याठिकाणी झाडा झुडपात मोठ्या प्रमाणात गावठी मोहा दारू सडवा जमिनीत गाडून आढळून आला.