वागळे इस्टेट परिसरामध्ये बिबट्याचा वावर दिसून आला आहे. सदर घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. ठाण्यातील श्रीनगर वारली पाडा, डोंगर भाग परिसर वागळे इस्टेट रोड नं. 27 येथे बिबट्या जाताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. सदरचा व्हिडिओ आज दिनांक 27 डिसेंबर रोजी रात्री 12वाजेपासून मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार बिबट्या सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये 26 डिसेंबर रोजी रात्रीच्या वेळी कैद झाला आहे.