मुळशी: हिंजवडी येथील त्या' अंगणवाडी सेविका आणि मदतनीसला कामावर येण्यास प्रतिबंध
Mulshi, Pune | Nov 30, 2025 अंगणवाडीतील चिमुकल्यांना कोंडून ग्रामपंचायत कार्यालयात बैठकीला गेल्याप्रकरणी अखेर अंगणवाडी क्रमांक तीनच्या सेविका सविता शिंदे आणि मदतनीस शिल्पा साखरे यांना कामावर येण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.तेथे दुसऱ्या अंगणवाडीतील सेविका आणि मदतनीसाला अतिरिक्त काम पाहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.