माळशिरस: नुकसान भरपाईच्या मागणीसाठी माजी आमदार राम सातपुते यांचा थेट मुख्यमंत्री यांना कॉल, मुख्यमंत्र्यांनी सांगितले मदत मिळणार
माळशिरस तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी माळशिरस तालुक्याचे माजी आमदार राम सातपुते यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन केला. दरम्यान, यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोनवर शेतकऱ्यांना मदत करणार असल्याचे सांगितले आहे. याबाबतचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचे आज सोमवार दिनांक 29 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास समोर आले आहे.