निलंगा: निलंगा तालुक्यातील
रामलिंग मुदगड येथे आढळला तरुणाचा मृतदेह
Nilanga, Latur | Dec 1, 2025 विहिरीत तरुणाचा मृतदेह निलंगा तालुक्यातील रामलिंग मुदगड येथे देविदास महादेव होगाडे (वय २८) याचा मृतदेह शनिवारी आढळून आला. देविदास हा पुण्यात टॅक्सी चालवत होता. तो गावाकडे आला असता दिनांक 28 नोव्हेंबर रोजी सकाळी ७ वाजता आईला मी शेताकडे जाऊन येतो, असे सांगून गेला. मात्र दिवस मावळला तरी घरी आला नाही. त्यामुळे कासारशिरसी पोलिसांना ग्रामस्थांनी ही माहिती दिली. विहिरीतील पाणी उपसा केल्यावर देविदासचा मृतदेह आढळून आला. शवविच्छेदनानंतर शनिवारी गावात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.