नागपूर ग्रामीण: स्मृती नगर येथे सेवानिवृत्त अधिकाऱ्याच्या घरी चोरी, दोन किलो 200 ग्रॅम चांदी सह लाखो रुपयांचा मुद्देमाल केला लंपास
पोलीस ठाणे कोराडी हद्दीतील स्मृतीनगर येथे दहाणारे हिमांशू चौधरी हे ऑडनस फॅक्टरी येथून सेवानिवृत्त झाली आहे. ते परिवारासह बरेली येथे गेले असता अज्ञात आरोपीने त्यांच्या फ्लॅटमध्ये प्रवेश करून रोख रक्कम, 643 ग्राम सोन्याचे दागिने, दोन किलो 200 ग्रॅम चांदीचे दागिने व डायमंडचे वेगवेगळे दागिने असा एकूण 31 लाख 43 हजार 760 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला याप्रकरणी प्राप्त तक्रारीवरून कोराडी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.