कत्तलीच्या इराद्याने जनावरांची वाहतूक करणाऱ्या एका वाहनावर वैजापूर पोलिसांच्या पथकाने कारवाई केली आहे.या कारवाई मध्ये पोलिसांच्या पथकाने वाहन व गोवंश जातीची जनावरे असा एकूण 4 लक्ष 62 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.प्रकरणात पोलिस कॉन्स्टेबल शुभम रावते यांनी फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.