गोरी गांधारी येथील ग्रामस्थांचे अंबड पंचायत समितीसमोर आमरण उपोषण उपोषणाचा दुसरा दिवस, ग्रामपंचायतीच्या कारभाराविरोधात संताप जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील गोरी गांधारी, गायत्री नगर, मोहिते वस्ती येथील रहिवाशांनी विविध प्रलंबित प्रश्नांबाबत अंबड पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाचा आज दुसरा दिवस असून ग्रामस्थांचा संताप अधिक तीव्र होत आहे. ग्रामस्थांनी दिनांक १ डिसेंबर २०२५ रोजी माननीय गटविकास अधिकारी, पंचायत समिती अंबड यांना निवेदन स