सावली: डोनाळा व सिरसी बेटातील जंगलात तीन बछड्यांसह वाघिणीला जेरबंद करण्यास वन विभागाला यश आले आहे
सावली तालुक्यातील डोनाळा व सिरसी बेटातील जंगलातील बछड्यासह वाघिणीने धुमाकूळ घातला होता यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते दरम्यान शेतकऱ्यांच्या मागणीनंतर नऊ नोव्हेंबर पासून वनविभागाच्या पथकाने वाघिणीला जेरबंद करण्यासाठी मोहीम राबवली होती नऊ नोव्हेंबरला दोन बछड्याला जेरबंद करण्यात आले तर काल सोमवारी दुपारी एकाला व रात्र उशिरापर्यंत वाघिणीला जेवण करण्यास वन विभागाला मोठे यश आले आहे