५३ व्या राज्यस्तरीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनी च्या अनुषंगाने " तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनी २०२५-२६" शिक्षण विभाग, पंचायत समिती हिंगणा तर्फे 'द रेडियन्स स्कुल' , जुनेवानी रोड हिंगणा येथे आयोजित करण्यात आली होती. या प्रदर्शनी ला उपस्थित राहून मुला मुलींनी अतिशय उत्तम व सुंदर प्रात्याक्षिक तयार करून प्रदर्शनीत सादर केले होते. प्रदर्शनीतील सर्व प्रात्याक्षिकांचे अवलोकन करून त्याबद्दल माहीती मुलांकडून जाणून घेतली. मुलांनी चांगले प्रात्याक्षिक तयार केल्याबद्दल सर्वांना शुभेच्छा दिल्या.